HSC Prose - Marathi translation

आर. के. नारायण (१ 190 ०6 ते २००१) रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर

नारायणस्वामी भारतीय इंग्रजी लेखकांपैकी एक प्रसिद्ध कादंबरीकार होते. ते चौदा कादंबर्‍या, पाच लघु लघुकथांचे आणि अनेक प्रवासी प्रवासांचे लेखक आहेत आणि त्यांच्या कल्पनेनुसार काल्पनिक कथा आहेत. त्यांनी ‘माय डेज’ (1975) हे संस्मरणही लिहिले.

नारायण यांनी मालगुडी हे काल्पनिक शहर तयार केले, जेथे सामान्यत: भारतीय शैलीतील वास्तववादी पात्र अप्रत्याशित घटनांमध्ये राहत होते.

त्याच्या कथा दयाळू मानवतावाद मध्ये आधारित आहेत आणि सामान्य जीवनातील विनोद आणि ऊर्जा साजरे करतात.

त्याच्या कथा साध्या शैली आणि सूक्ष्म विनोदाने दर्शविल्या जातात.

मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसने १ 195 2२ मध्ये नारायण यांची अमेरिकन वाचकांशी ओळख करून दिली.

यात ‘स्वामी आणि मित्र’, ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’ (१ 37 3737), ‘द डार्क रूम’ (१ 38 3838), ‘एन’

ज्योतिषी दिन आणि इतर कथा ’(१ 1947))),‘ श्री संपत ’(१ 9 9)),‘ आर्थिक तज्ज्ञ ’(१ 4 44),

‘महात्माची प्रतीक्षा’ (1955), ‘मार्गदर्शक’ (1958) आणि इतर बरीच पुस्तके.

त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीने त्यांना १ 61 .१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक सन्मान आहे.

त्यांचे लिखाण विनोद आणि अप्रमाणित विडंबनाने वेगळे आहे, एक अद्वितीय भारतीयता आणि एक साधेपणा जे पूर्णपणे मोहक आणि अस्सल आहे.

नारायण सामान्यत: मानवी नात्यांची विचित्रता आणि भारतीय दैनंदिन जीवनातील विचित्र गोष्टी चित्रित करतात.

त्याची शैली मोहक आहे, जेनिअल विनोद, अभिजातपणा आणि साधेपणाने चिन्हांकित केलेली आहे.

 

एका ज्योतिषाचा दिवस

एके दिवशी दुपारी नित्यनेमाप्रमाणे त्याने आपली झोळी उघडली आणि त्याच्या व्यवसायाची सर्व साधनसामग्री बाहेर काढून समोर मांडली; ज्यात होते डझनभर कवड्यांचे शिंपले, धूसर गूढ आकृत्या काढलेला कापडाचा एक चौकोनी तुकडा, एक वही आणि एक ताडपत्रांवरील लिखाणाचे बंडल. पवित्र भस्म आणि शेंदूर फासल्यामुळे त्याचे मस्तक तेजस्वी भासत होते आणि डोळ्यात एक तीक्ष्ण व विलक्षण चमक होती. खरे तर ती ग्राहकांना सतत शोधणारी नजर होती, पण त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना मात्र त्या नजरेत भविष्यवेत्त्याचे तेज जाणवत असे आणि ते त्यांना दिलासा देत असे. रंगवलेले कपाळ आणि गालांवर पसरलेल्या दाट मिशा यांच्या मधोमध असलेल्या त्याच्या डोळ्यांमधील तेज अधिक प्रखर वाटत होते : अर्थात एखाद्या वेडसर व्यक्तीचे डोळेदेखील अशा कोंदणात तेजस्वी वाटले असते. आणि जणू या सर्वांचा परिणाम अधिक खुलावा म्हणून की काय त्याने डोक्यावर भगव्या रंगाचा फेटा बांधला होता. ही रंगसंगती कधीही फिकी पडत नाही. डेलिया किंवा कॉसमॉसच्या फुलांकडे जशा मधमाशा आकर्षित होतात तसे लोक त्याच्याकडे आकर्षित होत असत. टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या वृक्षाच्या फांदधांखाली तो बसत असे. अनेक गोष्टींमुळे त्या जागेला खास महत्त्व होते. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या अरुंद रस्त्यावर अमाप गर्दी ओसंडून वाहत असे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेकविध प्रकारचे व्यवसाय आणि उदयोगधंदे चालत असत औषधांची दुकाने, चोरलेल्या लोखंडी वस्तू व भंगार वस्तूंचे विक्रेते, जादूगार आणि त्यात भर म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलावही तिथे चाले, त्यामुळे संपूर्ण शहरातून दिवसभर प्रचंड गर्दी त्या रस्त्यावर लोटत असे. त्याच्या शेजारी मोठ्याने ओरडत, बोंबाबोंब करीत एकजण तळलेले शेंगदाणे विकत असे; तो रोज त्याच्या मालाला वेगवेगळी मजेशीर नावे देत असे, एखाद्या दिवशी तो त्यांना "बॉम्बे आईस्क्रीम " म्हणे; तर दुसऱ्या दिवशी "दिल्ली बदाम आणि तिसऱ्या दिवशी "राजाची खास मेजवानी, अशा कित्येक नावांनी संबोधत असे, आणि लोकही त्याच्याकडे गर्दी करीत असत. यातली बरीचशी गर्दी ज्योतिषापाशीही रेंगाळत असे. ज्योतिषी शेजारच्या शेंगदाण्यांच्या ढिगावर ठेवलेल्या तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात आपला धंदा करीत असे. या ठिकाणाला जे जादुई वलय प्राप्त झाले होते त्याचे निम्मे श्रेय नगरपालिकेने तिथे दिव्यांच्या प्रकाशाची सोय न करण्याला होते. दुकानांच्या दिव्यांमुळे ती जागा (थोडीफार) उजळून निघत होती. एक-दोघांकडे फुसफुस आवाज करणारे गॅसचे दिवे होते, काहींनी खांबांवर उघड्या मशाली लटकवलेल्या होत्या, काहींकडे जुने सायकल दिवे लावलेले होते; आणि ज्योतिषासारखेच आणखी एक-दोघेजण स्वत:च्या दिव्यांशिवाय आपलं काम चालवीत होते. प्रकाशकिरण आणि हलणाऱ्या सावल्यांचा एक विस्मयकारक खेळ तिथे चालू असायचा. ज्योतिषाची मात्र त्यामुळे उत्तम सोय झाली होती; त्याचे कारण अगदी साधे होते, आयुष्याच्या सुरुवातीला ज्योतिषी बनण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता; कारण जिथे स्वतःच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार आहे हे ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. त्याच्या भाबड्या ग्राहकांइतकाच तोही ताऱ्यांविषयी अनभिज्ञ होता. तरीही त्याच्या बोलण्याने सर्वजण खुश होत असत आणि भारावून जात असत : कारण त्या बोलण्यात अधिकतर त्याचा अभ्यास, सराव आणि धूर्तपणे अंदाज वर्तवण्याची खुबी होती. असे असले तरीही, इतर कुठल्याही प्रामाणिक माणसाने करावे तसेच त्याचे कष्ट होते आणि दिवसाअखेरीस तो जी काही कमाई घरी घेऊन जाई; ते त्याच्या मेहनतीचे फळ असे.

कोणताही निश्चित विचार किंवा योजना न आखता तो आपले गाव सोडून आला होता. तिथेच राहिला असता तर आपल्या पूर्वजांचा कामधंदा करीत राहिला असता-म्हणजे शेतीवाडी, घरदार, लग्न-संसार, आणि मक्याच्या शेतात, वडिलोपार्जित घरात आयुष्य काढीत म्हातारा झाला असता. पण तसे व्हायचे नव्हते. कोणालाही न सांगता घर सोडून जाणे त्याला भाग पडले होते आणि आपला गाव शेकडो मैल मागे सोडून येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. एखादया गावकन्याच्या दृष्टीने हा पल्ला गाठणे म्हणजे जणू समुद्र पार करण्याइतकी मोठी गोष्ट होती.


लग्न, पैसा आणि मानवी नात्यांची गुंतागुंत, या मनुष्यजातीच्या सामान्य समस्यांचे त्याचे व्यावहारिक विश्लेषण चांगले होते. प्रदीर्घ सरावामुळे त्याचे त्यातले ज्ञान अधिक गाढ झाले होते. पाच मिनिटांच्या आतच काय समस्या आहे; हे त्याला समजत असे. प्रत्येक प्रश्नाचे तो ३ पेसे घेत असे, समोरची व्यक्ती कमीतकमी दहा मिनिटे बोलल्याशिवाय तो आपले तोंड उघडत नसे, त्यामुळे त्याला डझनभर उत्तरे आणि सल्ले देण्यास भरपूर मालमसाला मिळत असे. समोरच्या माणसाचा तळहात निरखून पाहत जेव्हा तो म्हणे. "तुमच्या कष्टांच्या तुलनेत हवे तेवढे यश तुम्हाला अनेक बाबतींत मिळत नाही, " तेव्हा दहापैकी निदान नऊजणांना तरी त्याच्याशी सहमत व्हावे लागे. किंवा तो विचारी, "तुमच्या कुटुंबात, अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का जिचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत?" किंवा स्वभावाचे विश्लेषण करून तो म्हणे, "तुमचे बहुतेक त्रास तुमच्या स्वभावामुळे होत आहेत. अर्थात शनि या ठिकाणी असताना तुम्ही आणखी वेगळे कसे असू शकणार म्हणा? तुमचा स्वभाव उतावळा आहे आणि तुमचे बाह्यरूप कठोर/उग्र वाटते." या त्याच्या बोलण्यामुळे लोक लगेच खुश होत असत, कारण आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांनासुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो; अशी कल्पना करायला नक्कीच आवडते.

शेंगदाणे विक्रेत्याने आपली ज्योत विझवली आणि तो घरी जाण्यासाठी उठला. ज्योतिषासाठीदेखील आपला पसारा गुंडाळण्याचा हा संकेत होता, कारण कुठूनतरी समोरच्या जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाशझोत सोडल्यास त्याला आता अंधारातच बसावे लागले असते. त्याने आपले कवड्यांचे शिंपले आणि इतर सामानसुमान उचलले आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवत असताना तो हिरवा प्रकाशझोतही गायब झाला. त्याने वर पाहिले तर त्याला एक माणूस समोर उभा असलेला दिसला. तो कुणी संभाव्य ग्राहक असू शकतो हे लक्षात आल्यावर तो म्हणाला : "तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात, थोडा वेळ इथे बसा आणि माझ्याशी बोला, तुम्हांला बरे वाटेल." तो मनुष्य मोघम काहीतरी पुटपुटला. ज्योतिषाने आपले म्हणणे पुन्हा पुढे दामटले; ज्यावर आपला तळहात ज्योतिषाच्या तोंडासमोर नेत तो म्हणाला, "तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस?" ज्योतिषाला ते आव्हान दिल्यासारखे वाटले, त्यामुळे त्याचा तळहात | हिरव्या प्रकाशझोताच्या दिशेने वळवत तो म्हणाला, "तुमचा | स्वभाव..." " थांबवा ते," तो मनुष्य म्हणाला. "मला मुद्द्याचे काय ते सांगा..." आपल्या मित्राचा स्वाभिमान दुखावल्यासारखे झाले. “मी प्रत्येक प्रश्नाचे फक्त तीन पैसे घेतो, आणि तुमच्या पैशांच्या बदल्यात जे तुम्हाला मिळते ते पुरेसे असते..." यावर आपला हात मागे घेत, त्याने एक आणा काढला. आणि त्याच्या दिशेने भिरकावत म्हणाला, "मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही खोटे सांगत आहात. फसवत आहात हे जर मी सिद्ध केले तर तो आणा तुम्ही मला व्याजासह परत करायचा.

 जर माझी उत्तरे तुला समाधानकारक वाटली तर तू मला पाच रुपये देणार का?"

 "नाही."

 "मग आठ आणे देशील?"

 "ठीक आहे, तुम्ही चुकीचे सांगितल्यास मला दुप्पट दयायला तयार असाल तरच, " तो मनुष्य म्हणाला. आणखी थोड्या युक्तिवादानंतर दोघांमध्ये हा करार मान्य झाला. ज्योतिषाने वर देवाकडे पाहत प्रार्थना केली आणि त्या मनुष्याने चिरूट पेटवला. काडेपेटीच्या उजेडात त्या इसमाच्या चेहऱ्याची एक झलक ज्योतिषाला दिसली आणि तो क्षणभर थबकला, एकीकडे रस्त्यावर मोटारींचे हॉर्न वाजत होते, बग्गीवाले आपल्या घोड्यांना हाळी देत होते आणि वाहत्या गर्दीचा गोंगाट पार्कच्या अर्धवट गडदपणाला आणखी कासावीस करीत होता. तो मनुष्य चिरुटाचे झुरके घेत धसमुसळेपणाने खाली बसला. ज्योतिषी अस्वस्थ झाला. "हे घे, तुझा आणा परत घे. मला असल्या आव्हानांची सवय नाही. आज मला उशीर झाला आहे."... तो आवराआवर करू लागला. त्याचे मनगट पकडत तो मनुष्य म्हणाला, "आता तुम्ही यातून सुटू शकत नाही. मी इथून जात असताना तुम्ही मला यात ओढलेत." ज्योतिषी त्याच्या तावडीत थरथरू लागला, त्याचा आवाज कापू लागला आणि क्षीण झाला. आज मला सोड. मी उदया तुझ्याशी बोलेन." आपला तळहात त्याच्या तोंडासमोर जोराने पुढे करीत त्याने म्हटले : "आव्हान हे आव्हान असते. सुरू करा." कोरड पडत असलेल्या घशाने ज्योतिषी पुढे बोलू लागला : एक स्त्री आहे ..

"थांवा," मनुष्य म्हणाला. 'मला हे सर्व नको आहे. माझ्या सध्याच्या शोधात मी यशस्वी होईन की नाही, याचे उत्तर दया आणि जा. नाहीतर मुकाट्याने तुमचे सर्व आणे मला देऊन टाकायचे तुम्ही मान्य करीपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही." ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले आणि उत्तर दिले : "ठीक आहे. मी बोलेन, पण मी जे सांगतो ते पटले तर तू मला एक रुपया देणार का? नाहीतर मी तोंड उघडणार नाही, मग तुला जे करायचे ते कर." बराच वेळ घासाघीस केल्यानंतर त्याने शेवटी ते मान्य केले. ज्योतिषी म्हणाला: "तुला मरणासन्न अवस्थेत सोडले होते. बरोबर?"

 "हं, पुढे सांगा."

 'एकदा सुरा खुपसला होता तुझ्या शरीरात? " ज्योतिषाने विचारले. "भले बहाद्दर!" त्याने आपल्या छातीवरचा व्रण दाखवला. "अजून काय?"

 आणि मग तुला शेताजवळच्या एका विहिरीत ढकलून दिले होते. आणि मरायला सोडून दिले होते." "तिथून जाणाऱ्या एका इसमाने विहिरीत डोकावून पाहिले नसते तर मी मेलोच असतो," भावनावश होत तो मनुष्य उद्गारला, "मी त्याचा बदला कधी घेऊ शकतो?" मूठ घट्ट आवळत त्याने विचारले.

"पुढल्या जन्मी," ज्योतिषाने उत्तर दिले. "चार महिन्यांपूर्वी त्याचा एका दूरवरच्या गावात मृत्यू झाला. तुला तो यापुढे कधीही दिसणार नाही." हे ऐकूत तो इसम हळहळला, ज्योतिषी पुढे म्हणालाः

"गुरू नायक "तुम्हांला माझे नाव माहीत आहे!" तो आश्चर्यचकित होत म्हणाला.

"जशा मला इतर अनेक गोष्टी माहीत आहेत. गुरू नायक, माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घे. या शहराच्या उत्तरेला दोन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर तुझे गाव आहे, पुढची ट्रेन पकड आणि निघून जा. तू घराच्या बाहेर पडलास तर तुझ्या जीवाला पुन्हा एकदा मोठा धोका आहे असे मला दिसते." त्याने एक चिमूटभर पवित्र राख बाहेर काढली आणि त्याच्यासमोर धरली. "तुझ्या कपाळावर ही फास आणि घरी जा. पुन्हा कधीही दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस, म्हणजे तू शंभर वर्षे जगशील."

'मी पुन्हा घर सोडून का जाऊ?" तो इसम विचार करीत म्हणाला. "मी वारंवार त्याला शोधण्याकरिता आणि तो मला भेटल्यावर त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने बाहेर पडत असे." त्याने खेदाने मान हलवली. " तो माझ्या हातातून निसटला. निदान त्याला त्याच्या लायकीप्रमाणे मृत्यू आला असेल; असे मी समजतो." "होय," ज्योतिषी उत्तरला. "तो एका लॉरीखाली चिरडला गेला." हे ऐकून त्याला आनंद झाला.

ज्योतिषी आपले साहित्य गोळा करून आपल्या झोळीत घालोपर्यंत ते ठिकाण सुनसान झाले होते. हिरवा उजेडाचा झोतही नाहीसा झाला होता, आणि आता ती जागा अंधारात व शांततेत बुडून गेली होती. ज्योतिषाला मूठभर नाणी देऊन तो अनोळखी मनुष्यही रात्रीच्या अंधारात निघून गेला होता.

ज्योतिषी घरी पोहोचला तोवर जवळजवळ मध्यरात्र झाली होती. त्याची पत्नी दारातच त्याची वाट पाहत होती. तिने त्याला (उशिरा येण्याबद्दल) स्पष्टीकरण मागितले, तिच्याकडे नाणी उडवीत तो म्हणाला, "ही मोज, ती सगळी एका माणसाने दिली आहेत." "साडे बारा आणे," मोजत ती म्हणाली. तिला फार आनंद झाला. "उदया थोडा गूळ आणि नारळ मला आणता येईल. छोटी कित्येक दिवसांपासून मिठाई मागत आहे. मी तिच्यासाठी काहीतरी छान पदार्थ बनवीन."

"त्या इकराने मला फसवले! त्याने मला एक रुपया दयायचे कबूल केले होते," ज्योतिषी म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिले. "तुम्ही काळजीत दिसता. काय घडलंय? 'काही नाही."

रात्रीच्या जेवणानंतर, खाटेवर बसून, तो तिला म्हणाला, "तुला माहीत आहे का, की आज माझ्या डोक्यावरून किती मोठे ओझे उतरले आहे? इतकी वर्षे एका माणसाच्या रक्ताने माझे हात माखले होते; असे मला वाटत होते. त्याच कारणामुळे मी घरातून पळालो, इथे स्थायिक झालो, आणि तुझ्याशी लग्न केले. तो जिवंत आहे. धास्तावून तिने म्हटले, 'तुम्ही त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला?"


"हो, आमच्या गावामध्ये, त्या वेळी मी एक मूर्ख तरुण होतो. एके दिवशी, आम्ही मदयपान केले, जुगार खेळलो आणि भयंकर भांडण केले-आता कशाला त्याचा विचार करायचा ? झोपायची वेळ झाली," जांभई देत तो म्हणाला, आणि त्याने खाटेवर स्वत:ला ताणून दिले.

- आर. के. नारायण


Comments

Popular posts from this blog

Basic Concepts of English Grammar