1.2 ON SAYING PLEASE  शिष्टाचाराचे महत्त्व...

सिटी ऑफिसमधल्या त्या तरुण लिफ्टमनचे निःसंशयपणे चुकले होते. त्या दिवशी सकाळी लिफ्टमधील एका प्रवाशाला त्याने लिफ्टमधून बाहेर हाकलले आणि त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर दंड ठोठावला गेला. त्याचा मुद्दा “प्लीज/कृपया” म्हणण्याचा, विनंती करण्याचा होता. लिफ्टमध्ये प्रवेश करताना तक्रारदार "टॉप (सर्वात वरचा मजला),” असे म्हणाला होता. मात्र लिफ्टमनने “टॉप, " असे त्याने म्हणावे, अशी मागणी केली होती. आणि प्लीज,'


या मागणीस नकार दिल्याबद्दल त्याने सूचनेचे पालन करण्यास नकार तर दिलाच, पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढले. शिष्टाचाराची, सभ्य वागणुकीची स्थाने नक्कीच अवाजवी अपेक्षा केली होती. अशिष्ट वर्तन हा कायदेशीर गुन्हा नाही, त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. जर माझ्या घरात वीर शिरला आणि मी त्याला मारले तर कायदा मला निर्दोष ठरवील आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळेल. ती मिळते. कारण चोराने, त्या हल्लेखोराने निश्चितपणे कायदेभंग केलेला असतो. परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही, कारण हा कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध आहे; असे ती यंत्रणा स्वतःच मानत नाही. तेव्हा लिफ्टमनबद्दल सहानुभूती बाळगूनही आपण हे मान्य केले पाहिजे, की कायदा योग्य आहे. लोकांचे वर्तन आवडले नाही, किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी वाढली किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही, म्हणून त्यांना ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळून चालणार नाही. (कारण असे झाले तर) आपल्या मुठी वळायच्या कधीच थांबायच्या नाहीत, आपले हात सतत उचलले जातील आणि शहरांतल्या गटारांमध्ये दिवसभर रक्ताचे पाट वाहतील.


मी मला वाटेल तसा असभ्य वागेन आणि हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझे संरक्षण करील. मी कितीही गर्विष्ठपणे वागीन किंवा उद्धटपणा (घमेंड) दाखवीन तरी असभ्य वर्तन करणारा, उद्धट माणूस असा शिक्का बसण्याव्यतिरिक्त अधिअधिक दंड मला सोसावा लागणार नाही. मी मिश्या काढाव्या की नाही, माझे केस रंगवावे किंवा पाठीवर केसांची झुलपे वाढवावी की नाही, हे जसे कायदा मला सांगत नाही तसेच मला विनंती करायला, "कृपया" म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा करीत नाही. कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावल्या जाणे हा नुकसानभरपाईचा खटला होऊ शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही.


मात्र याचा अर्थ है नुकसान नगण्य, किरकोळ असते, असा होत नाही. लिफ्टमन कमालीचा दुखावला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्याच्या दृष्टीने तो अशिष्ट वर्तणूक म्हणजे त्याच्या सामाजिक स्तराची केलेली अवहेलना होती. त्याच्या नडगीवर कुणी लाथ मारली असती तर कदाचित त्याला तितके दुःख झाले नसते, आणि कायदेशीर कारवाईने त्याचे निवारणही झाले असते. लाथ मारल्याने होणारी शारीरिक इजा किंवा वेदना काही काळानंतर नाहीशी होते; परंतु स्वाभिमानाला लागलेली ठेच किंवा स्वत्वाला झालेली वेदना तुमचा संपूर्ण दिवस विघडवू शकते. मला कल्पना आहे की, अवहेलना करणान्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिलेल्या प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागल्याबद्दल लिफ्टमन पुढचे अनेक तास कुढत राहिला असणार, आणि संध्याकाळी पत्नीकडे व्यक्त होऊन आपली मनःस्थिती पूर्ववत करण्याचा मानसिक संतुलन परत मिळवण्याचा एकमेव मार्ग त्याने अवलंबला असणार कारण वाईट मनःस्थिती आणि वाईट वर्तणूक या गोष्टींची लागण खूप सहजपणे होत असते. जेव्हा सर अँथनी अब्सोल्यूटने कॅप्टन अॅब्सोल्यूटला धमकावले, तेव्हा कॅप्टन बाहेर जाऊन त्याच्या माणसाला, फॅगला धमकावले, आणि फैराने खाली जाऊन तरुण नोकराला लाथ मारली. ज्याने लिफ्टमनला नुसते "टॉप" म्हटले तोही कदाचित त्याच्या मालकावरचा राग व्यक्त करीत होता, ज्याने त्याला "गुड मॉर्निंग" म्हटले नव्हते, कारण त्याला त्याच्या बायकोने न्याहारीच्या वेळी सतावले होते, जिच्याशी स्वयंपाकीण उद्धटपणाने वागली होती, कारण तिला मोलकरणीने "उलट उत्तर दिले होते. आपण आपल्या गैरवर्तनाने साऱ्या जगातील वातावरण दूषित करीत असतो. किंबहुना दैनंदिन जीवनप्रवाह गढूळ करण्यात कोर्टाच्या खटल्यांतील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनांचा वाटा मोठा असावा. एरवी सुसंस्कृत          असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी स्त्री सहन करीत असते, तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली होतात्म्याचे जिणे जगत असतात. तरीदेखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराचा, सभ्यतेचा संरक्षक होऊ शकत नाही. कोणत्याही धर्मग्रंथात (द टेन कमांडमेंट्स) अशा कैक अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुवंर्तन, आणि आपली मनःस्थिती व शिष्टाचारावर नियंत्रण ठेवल असा कायदा अमलात आणू शकत नाही.

 लिफ्टमनविरुद्ध दिलेल्या निर्णयाचे समर्थन करण्यास आपण बांधील असलो बन्याच लोकांना त्याच्याबद्दल मनात थोडो सहानुभूती वाटत असेल. आपल्याला विनंती भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही हे खरे असले तरी आपल्याला सभ्यता शिकवण देणारा, कोणत्याही कायदयाहून अधिक जुना, अधिक पवित्र असा सामाजिक संकेत अस्तित्वात आहे. आणि त्या सभ्यतेची पहिली आवश्यक कृती म्हणजे मिळालेल्या सेवेची पोच देणे, समाजाचा एक (सुसंस्कृत) घटक म्हणून "कृपया" आणि " धन्यवाद" यांच्याद्वारे आपण समाजाचे देणे चुकते करीत असतो. या छोट्याशा सौजन्यांच्या स्नेहाचे वंगण घालून आपण जीवनरूपी रथ सुरळीतपणे बाकी असतो. यांमुळे वरिष्ठांनी कनिष्ठांना हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न घडता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ व्यवहारातून संवाद घडतो. एखादया सेवेची मागणी केली असता; ती रागाने नाही तर स्वखुशीने आणि चांगल्या भावनेने पूर्ण होऊ शकत असेल; तर केवळ एखादी विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच जबरदस्तीने ती मिळवायचा प्रयत्न करील.


या संदर्भात माझ्या एका सौजन्यशील कंडक्टर मित्राविषयी सांगायला मला नक्की आवडेल. या सापत्नभाव दर्शवणाऱ्या शीर्षकातून इतर कंडक्टरांविषयी कोणतेही मतप्रदर्शन करण्याचा माझा हेतू नाही. उलटपक्षी, असे काही लोकांचे गट आहेत जे त्यांच्या कष्टदायी अनुभवांतून बस कंडक्टरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तावून सुलाखून बाहेर पडत असतात, हे मी खात्रीने सांगू शकतो. प्रवाशांना आपला जन्मजात शत्रू समजणारे अनेक खडूस, वैतागलेले नमुने आपल्याला वेळोवेळी भेटतात ज्यांच्या मते फसवणे हाच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा मुख्य हेतू असतो, आणि ज्यांना फक्त चढ्या आवाजात आणि दमदाटी करूनच प्रामाणिकपणाने वागण्यास भाग पाडले जाऊ शकते. अर्थात, हा प्रकार पूर्वी होता त्यापेक्षा दुर्मीळ आहे. बसेस चालवणाऱ्या अंडरग्राउंड रेल्वे कंपनीकडून, त्यांच्या कर्मचारीवर्गाकडून विशिष्ट दर्जाची सभ्य आणि सौजन्याची वर्तणूक मिळावी; असा सर्वसामान्य जनता आग्रह धरीत आहे आणि तो दर्जा राखला जाईल याची काळजी घेतली जात आहे, अशी कल्पना करायला मला आवडेल. असे झाले तर प्रवाशांचा प्रवास सुखद तर होईलच, पण त्याबरोबर एक मोलाची सामाजिक सेवाही घडेल.

म्हणूनच, इतर सर्व कंडक्टरवर्गाविषयी कोणतीही अपकारक भावना न बाळगता, मी त्या वर्गाच्या एका विशिष्ट सदस्याला सलाम करू इच्छितो. एके दिवशी बसमध्ये उडी मारून चढल्यावर खिशात पैसे न बाळगता आपण घराबाहेर पडलो आहोत हे माझ्या लक्षात आले आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची मला सर्वप्रथम जाणीव झाली. हा शोध लागल्यावर काय वाटते, कोणत्या संमिश्र भावना मनात येतात, याचा प्रत्येकाला अनुभव आलेला असणार. एक म्हणजे तुम्ही मूर्ख आहात किंवा त्याहून वाईट म्हणजे लबाड आहात, असा समज होऊ कतो, या विचाराने तुम्ही स्वतःवर वैतागता. आणि त्या वेळी "हो, मला ही जुनी युक्ती पक्की ठाऊक आहे. तेव्हा आता उतरा खाली," असे तुमच्याकडे थंडपणे पाहत जर कंडक्टर म्हणाला; तर तुम्हांला अजिबात आश्चर्य वाटत नाही. त्यातून जरी तो कंडक्टर सद्गृहस्थ असला आणि त्याने तुम्हांला सहजपणे उतरू दिले, तरी तुम्हांला परत जावे लागते, तुमची गैरसोय होते, आणि कदाचित तुमची ट्रेन किंवा ठरलेली भेटही चुकते.


खिशात कुठेतरी भरकटलेली काही चिल्लर नाणी सापडतात का पाहावे म्हणून मी माझे खिसे तपासले, आणि आपण पूर्णपणे कफल्लक आहोत हे ध्यानात आल्यावर मी कंडक्टरला शक्य तितक्या प्रामाणिक चेहऱ्याने म्हटले, की मी भाडे देऊ शकत नाही.

आणि पैशासाठी मला परत जावे लागेल. "अहो, तुम्हांला उतरून जाण्याची गरज नाही: राहू दे, काही हरकत नाही," तो म्हणाला. "बरं," मी म्हणालो, “पण माझ्याजवळ एकही पैसा नाही.' “ठीक आहे, मी तुमचे तिकीट काढतो," त्याने उत्तर दिले, "तुम्हांला कुठे जायचे आहे?" असे विचारत त्याने तिकिटांचे बंडल अशा सफाईदारपणे हाताळले, की जणू तो मला बँक ते हाँगकाँगपर्यंत कुठलेही तिकीट देण्यास तयार होता. मी त्याच्या दयाळूपणाबद्दल आभार मानत मला कुठे जायचे आहे ते सांगितले आणि तो तिकीट देत असताना त्याला विचारले, "पण याचे भाडे मी कुठे पाठवू?” “अहो, आपली पुन्हा कधीतरी गाठ पडेलच की," तो हसत म्हणाला आणि मागे वळला. तेवढ्यात सुदैवाने, अजूनही खिसे चाचपडणाऱ्या माझ्या बोटांना खिशाच्या कोपऱ्यात एक शिलिंग (नाणे) सापडले आणि मी हिशोब चुकता केला. पण त्यामुळे एका चांगल्या कृत्यामुळे माझ्या मनावर जी प्रसन्नतेची लहर उमटली होती; ती जराही कमी झाली नाही. काही दिवसांनंतर, बसच्या वरच्या मजल्यावर वाचत बसलो असताना नेमका माझा दुखरा (हुळहुळा) अंगठा जोरात तुडविला


गेला. काहीसा राग आणि बरीचशी वेदना झाल्यामुळे मी वर पाहिले, तर माझ्या त्या मित्राची प्रसन्न मुद्रा मला दिसली. "सॉरी, सर, तो म्हणाला. "हे बूट जड आहेत मला माहीत आहे, पण हे घ्यायचे कारण माझे स्वतःचे पाय अनेकदा तुडवले जातात, पण आता मी इतर लोकांच्या पायावर पाय देत आहे. सर, तुम्हांला इजा झाली नाही अशी आशा करतो." मला वेदना होत होती, पण तो इतका आपुलकीने त्याविषयी बोलला, की मी आपसूकच मला काही झाले नाही, असे त्याला ठासून सांगितले.

त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्याच्या बसमध्ये चढत असे तेव्हा मी त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या सदैव चांगले वागण्याच्या वृत्तीविषयी मला एक कुतूहलपूर्वक आनंद वाटू लागला. त्याच्याकडे संयमाचा अमर्याद साठा आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास घडवण्याची उपजत देणगी असावी असे मला वाटले. कधी पाऊस पडत असेल तर एखाद्याला “आतमध्ये रिकामी जागा आहे" हे सांगायला तो पायऱ्या चढून वर जातो, असे माझ्या लक्षात आले. वृद्ध लोकांशी तो पोटच्या मुलाच्या मायेने वागे, तर लहान मुलांशी एखादया वडिलांइतका काळजीवाहू. तरुण लोकांसाठी त्याच्या मनात विशेषकरून जिव्हाळा होता, आणि तो त्यांच्याबरोबर नेहमी थट्टामस्करी करीत असे. कुणी अंध व्यक्ती असेल तर त्याला पदपथावर सुरक्षितपणे खाली उतरवून तो थांबत नसे, तो स्वतः रस्त्यापलीकडे किंवा कोपऱ्यापर्यंत नाहीतर त्याच्या मार्गावर सुखरूपपणे सोडेपर्यंत समोरच्या बिलला


थांबायला सांगत असे. थोडक्यात म्हणजे, तो वातावरणात

सुस्वभावाचे आणि जिव्हाळ्याच अस वा


असे; की त्याच्याबरोबरचा प्रवास हा स्वाभाविक सौजन्य आणि सद्वर्तनाचा धडा होता, हे मला जाणवले. तो ज्या सहजतेने त्याचे काम करीत असे ते मला सर्वाधिक भावले. गैरवर्तणूक, अशिष्ट वर्तन जसे संसर्गजन्य असते तसे सद्वर्तनदेखील. असभ्यतेचा अनुभव आला, की आपल्यातील बहुतेक लोक स्वतःही असभ्यपणे वागू लागतात, मात्र अशा प्रसन्न लोकांच्या सहवासाचा स्वतःवर परिणाम न होऊ देणारी एखादी संस्कारहीन व्यक्ती अपवादानेच आढळेल. शिष्टाचाराचेही हवामानासारखेच असते. किट्स म्हणतात, 'एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तींनाही उल्हसित करतो," त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्तीदेखील एखादया उदास व्यक्तीच्या मनात चांगल्या दिवसासारखी प्रसन्नता रुजवू शकते. म्हणूनच त्या सुसंस्कृत कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण असे आणि त्याची सभ्यता, सलोख्याचे वर्तन व खिलाडू वृत्ती त्याच्या प्रवाशांमध्येही पसरत असे. त्यांची मने हलकी करताना तो आपले कामही हलके करीत असे. आणि त्याची प्रसन्नता, उत्साह व्यर्थ नव्हता, तर ती एक मोलाची गुंतवणूक होती.


आजकाल माझ्या बस मार्गावर त्याची भेट होत नाही; पण आपला प्रसन्नतेचा प्रकाश तो दुसऱ्या मार्गावर नक्कीच पसरवत असेल, अशी मला आशा आहे. या नीरस, कंटाळवाण्या जगात सर्वदूर तो पसरवणे इतके सोपे नाही. त्यामुळे त्या अज्ञात बस कंडक्टरवर स्तुतिपर भाषण लिहिल्याबद्दल मी कदापि दिलगिरी व्यक्त करणार नाही. वर्ड्सवर्थ जर एका गरीब, जळवा गोळा करणाऱ्याकडून कुठल्याशा ओसाड प्रदेशात शहाणपणाचे धडे घेऊ शकला, तर मग सुस्वभावाने व दयाळू भावनेने केलेली सर्वसामान्य सेवादेखील किती सन्माननीय असू शकते

हे दाखवून देणाऱ्याकडून काही लोकांनी तरी आचरणाचे धडे घेण्यास मला काहीच हरकत वाटत नाही.


दैनंदिन जीवनातल्या वातावरण आनंदी करणाऱ्या छोट्या छोट्या संस्कृतींवर, शिष्टाचारांवर युद्धामुळे भयंकर दुष्परिणाम झाले आहेत. ही गोष्ट सर्वमान्य आहे. परंतु आपल्याला जर परस्परांचे जीवन आनंदी आणि सुसह्य बनवायचे असेल तर ते शिष्टाचार पर आणले पाहिजेत. कायदयाचा बडगा दाखवून आपण ते परत मिळवू शकत नाही. अजून तेवढा सुसंस्कृत नसलेल्या आपल्या समाजासाठी पोलीस हा एक गरजेचा घटक आहे आणि कायदा ही एक आवश्यक संस्था आहे. परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यांपासून आपले संरक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे, लिफ्टमनने नैतिक अपमानाला उत्तर देण्यासाठी अवलंबलेली शारीरिक हिंसाचाराची पद्धतही आपल्याला शिष्टाचार पुनर्स्थापित करण्यासाठी मदत

करू शकत नाही. त्याने 'कृपया' न म्हणणाऱ्या त्या सद्गृहस्थाशी अतिविनयशील पद्धतीने वर्तन केले असते तर तो अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने बदला घेऊ शकला असता, असे त्याला सुचवावेसे मला वाटते. त्यामुळे केवळ त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील त्याला विजय मिळवता आला असता आणि तो खरा विजय ठरला असता. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावत असेल, परंतु त्याचा आध्यात्मिक, नैतिक विजय नेहमी होतो. लिफ्टमनला चेस्टरफिल्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे. त्या काळी लंडनच्या रस्त्यांवर आजच्या सारखे बांधीव फुटपाथ नव्हते. जो भिंतीच्या बाजूने चालत जात असे त्याला कोरडी पायवाट मिळत असे. एक दिवस चेस्टरफिल्डला रस्त्यात भेटलेला एक माणूस म्हणाला, "मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही." त्यावर मान झुकवून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफिल्ड उत्तरला, “मी नेहमीच देत असतो." त्याने घेतलेला हा बदला, दिलेले हे प्रत्युत्तर त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त समर्पक होते, हे लिफ्टमनला पटेल; अशी मला आशा आहे.


अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर

Comments

Popular posts from this blog

HSC Prose - Marathi translation

Basic Concepts of English Grammar